Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

तुमची लढाई लढण्यासाठी कुकर समोरील बटण दाबा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 28, 2024
in राजकीय
0
तुमची लढाई लढण्यासाठी  कुकर समोरील बटण दाबा
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अकोल्यातील जनतेला आवाहन

अकोला : आरएसएसला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचे आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केले आहे. अकोल्यातील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.

औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही 2 ते 3 तासात संपवून टाकला ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले. आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे. असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.

आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून जो NRC आणि CAA आला आहे. हा असंविधानिक आहे. संविधान म्हणते की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे, त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात. तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही. पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

आज ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना मी काही महिन्यांपासून म्हणत आहे की, लोकांना आतून बदल पाहिजे आहे. 24 लाख हिंदू परिवार 2014 पासून नागरिकत्व सोडून स्थलांतरित झाले आहेत की, ज्यांची संपत्ती 50 करोडपेक्षा कमी नाही या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मी इथल्या पक्षांना म्हणत होतो की, आता एक नवीन चेहरा दाखवणे गरजेचे आहे. एकता दाखवणे गरजेचे आहे आणि एकता अशा संघटनांची दाखवणे गरजेचे आहे की, जी कधी भाजपासोबत समझोता करणार नाही. याचीही त्यांनी आठवण करून दिली.

लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की, त्यांनी १०० टक्के मतदान करावे तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिले, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असे होईल. असेही त्यांनी म्हटले.

धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांचे प्रश्न सोडवावेत

मुस्लिमांची लढाई ही NRC, CAA आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची आहे. मी आशा करत होतो की, काँग्रेस आमच्यासोबत समझोता करेल तो केला नाही. पण काँग्रेस पार्टी एवढे करू शकत होती की, काही जागा या मुस्लिमांना देईल पण राजस्थान असो किंवा अन्य ठिकाणी काँग्रेस जागा देत नव्हती. मुस्लिमांच्या प्रश्नांना जोपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्ष उचलत नाहीत, तोपर्यंत या देशात शांती राहणार नसल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.


       
Tags: AkolaLoksabhaMaharashtramahavikasaghadiParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यातील मतदारांना सुजात आंबेडकर यांनी केले आवाहन

Next Post

अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

Next Post
अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

अकोल्यात सामूहिक संविधान पठणाचा कार्यक्रम पार पडला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
बातमी

जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

by mosami kewat
August 31, 2025
0

‎‎जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके...

Read moreDetails
हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

August 31, 2025
दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याने खळबळ उडाली

August 31, 2025
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 31, 2025
भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

भटके-विमुक्त समाज : स्वातंत्र्यानंतरही ओळखीच्या शोधात

August 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home