Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
August 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
       

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार मिळतील आणि तुमच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

भटके विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या वतीने साने गुरुजी स्मारक सभागृहामध्ये आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व या परिषदेचे संयोजक ॲड. डॉ. अरुण जाधव स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम, ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाने, ॲड. अरविंद तायडे, प्राचार्य बाबुराव शिंदे, डॉ. दीपा राजमाने, उमाताई जाधव अंबरसिंग चव्हाण यांच्यासह वासुदेव, गोंधळी, बहुरूपी, रायरंद, मरीआईवाले, इत्यादी पारंपरिक लोक कलावंत भटक्या मुक्त जाती जमाती मधील विविध संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होतेय. 

यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्या विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणायची असेल तर प्रत्येकाने आपल्या गावागावात जाऊन निवडणुकीच्या वेळी मी माझ्या मताची किंमत करणार नाही, स्वतःला विकणार नाही आणि दुसऱ्यालाही विकू देणार नाही असा निर्धार केला पाहिजे. आपण जर आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या हक्काची भाकर खात असू तर मग आपण स्वाभिमानाने जगले पाहिजे. दुसऱ्यांची गुलामगिरी व लाचारी न पत्करता आपला स्वाभिमान जिवंत ठेवला पाहिजे.

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 1990 साली काढलेल्या ‘बिऱ्हाड मोर्चा’ची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्यावेळी आम्हाला मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी अडवले, त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. आमच्या वकिलांनी याचिका दाखल केली आणि केवळ हॅबिट्युअल अॅक्ट नुसार कुणाला गुन्हेगार ठरवता येणार नाही असे ठणकावून सांगितले. त्यामुळे तो कायदा रद्द झाला. कोर्ट एखादा कायदा रद्द करू शकते. मात्र नवीन कायदे करायचे असतील तर ते विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहातच करता येतात. त्यासाठी आपल्याला आपले हक्काचे प्रतिनिधी असले पाहिजे असे ते म्हणाले. 

ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, भटके विमुक्त समाजाला माणसासारखे स्वाभिमानी जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी आपण मागच्या महिन्यात राज्यभर ‘मुसाफिर यात्रा’ करून सर्व भटके मुक्तांना एकत्र केले. त्यांच्यामध्ये जनजागृती केली. त्याचबरोबर पुणे येथे राज्यस्तरीय भटके मुक्त परिषदेचे आयोजन केले. त्यासाठी संपूर्ण पुणे जिल्हा पिंजून काढला. त्यासाठी भटक्या विमुक्तांच्या पाला पालावर जाऊन त्यांना माहिती दिली. त्यावेळी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की पुण्यात भटके मुक्तांची परिषद कशासाठी ?  तर आम्ही म्हणतो आमचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या शिकवणुकीचे आम्ही आचरण करतो. स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी भटके मुक्तांना अजूनही आपल्या हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही. भारतीय संविधानाने दिलेला हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी पुन्हा एकदा भटकेमुक्तांनी रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकावी लागेल. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवून ती जिंकली पाहिजे. तरच आपला आवाज बुलंद होऊ शकतो असे ते म्हणाले.

यावेळी अंबरसिंग चव्हाण, ॲड. मंगेश ससाने यांची ही भाषणे झाली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ॲड. डॉ. अरुण जाधव लिखित भटक्या विमुक्तांच्या पंचाहत्तरी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन झाले. प्रारंभी शाहीर सचिन माळी शीतल साठे व सहकाऱ्यांनी आंबेडकरी नवयान जलसा सादर केला. लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष तथा भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक बाबुराव सुरपे यांनी आभार मानले. भटके विमुक्त परिषदेच्या उद्घाटनापूर्वी सकाळी 11 वाजता सारसबाग जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून भटके विमुक्त प्रवर्गातील पारंपरिक लोक कलावंतांची आपल्या पारंपारिक वेशभूषा, वाद्य व नृत्य संगीतासह भव्य मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये नंदीवाले, वासुदेव, पिंगळा जोशी, मरीआईवाले, गोंधळी, उंटवाले, रायरंद, बहुरूपी, गोसावी, चित्रकथी, डोंबारी, कोल्हाटी, नाथपंथी डवरी गोसावी अशा अठरापगड जातीतील कलावंत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल पवार, ऋषिकेश गायकवाड, संदीप आखाडे, ललिता पवार, रेश्मा औटी, विशाल पवार, भक्ती पवार, मच्छिंद्र जाधव, संदीप आव्हाड, सागर कांबळे, उर्मिला कवडे, नीता इंगळे आदींनी परिश्रम घेतले.


       
Tags: Arun Aba JadhavBhatke Vimukta SamajMaharashtraPoliticalpuneVanchit Bahujan Aghadi
Previous Post

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

Next Post

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

Next Post
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home