Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

mosami kewat by mosami kewat
September 1, 2026
in बातमी, राजकीय, संपादकीय
0
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार
       
अमरावती: तिवसा तालुक्यातील सारसी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवरून बौद्ध बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव तथा आंदोलक सागर भवते यांना प्रवेश नाकारण्यात आले. यामुळे बौद्ध बांधवांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

सारसी येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा बौद्ध बांधवांनी केला आहे. त्यानंतर या मागणीसाठी बौद्ध बांधवांच्या वतीने सकाळी ११ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी तिवसा तहसीलदारांशी चर्चा केली होती. संबंधित प्रकरणी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवेशद्वाराची मागणी करणाऱ्या दोन्ही अर्जदारांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले होते, असे भवते यांनी सांगितले.

मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रवेशद्वाराची मागणी करणाऱ्या दोन्ही गटांसह आंदोलक सागर भवते यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराचा निषेध करत बौद्ध बांधवांनी तहसीलदारांच्या भूमिकेविरोधात बैठकीवर बहिष्कार टाकला.

दरम्यान, प्रवेशद्वाराच्या या प्रकरणी आंदोलक सागर भवते यांच्यासह सारसी येथील सर्व बौद्ध बांधवांशी तालुका प्रशासनाने चर्चा करावी. चर्चा झाल्याशिवाय या प्रकरणी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी ठाम भूमिका बौद्ध बांधवांनी घेतली आहे.

सारसी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी २५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा तहसीलदारांनी ३१ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज तहसीलदारांनी एका विशिष्ट समूहाच्या मागणीचे समर्थन केल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केल्याशिवाय या प्रकरणी कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. आम्ही कायद्यानुसार रस्त्यावरची लढाई लढू,” असा इशारा सागर भवते यांनी दिला.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home