मुंबई : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मुंबई येथे बौद्ध समाजाच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
यावेळी येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रतिनिधीत्वाबाबत रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी समाजाच्या विविध मागण्यांवर भाष्य करताना संघटनात्मक बळकटतेवर भर देण्याचे आवाहन केले. बैठकीस भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रेमा साळवी यांचे मुंबईत निधन; अंत्यविधीसाठी आंबेडकर कुटुंबीयांची उपस्थिती!
मुंबई : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या सासूबाई प्रेमाआई पांडुरंग साळवी यांचे आज मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या...
Read moreDetails






