मुंबई( ८डिसेंबर) : आंतरराष्ट्रीय बजरंग दल आयोजित एका कार्यक्रमात एका साधू परमहंस याने भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत ट्विटरच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे.
चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि संविधानाच्या आचार -विचारांवर हल्ला करण्यासाठी हा मूर्ख, अर्धबुद्धी, काहीही न जाणणारा गुंड बाबासाहेबांचा चुकीचा उल्लेख करत नाही, तर माझ्या राज्यात द्वेष, जातीयवाद आणि मृत्यूचा RSS-भाजपचा अजेंडा पसरवण्यासाठी अत्यंत अपमानास्पद शब्द वापरत आहे. असे ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
गाढव गाढवच राहतील. हे लोक संतांच्या वेषात गाढवं आहेत.
ते स्वतः मनुवादी विचाराचे गुलाम आहेत. त्यांच्या शरीरात वाहणाऱ्या रक्तात गुलामीचा डीएनए आहे, त्यामुळेच त्यांना मुक्त विचारसरणीच्या संविधानाचा तिरस्कार आहे. अशा गाढवांमुळे आजही संपूर्ण देश जातिभेद, जातीय द्वेष आणि मनुवादी विचारसरणीत बुडालेला आहे. या विचाराने तुम्ही २५०० वर्षे गुलाम राहिलात. याची लाज बाळगा. असे देखील त्यांनी म्हटले आहे