अकोला : अकोल्यातील कानशिवनी येथे पाटील समाजाच्या वतीने सांप्रदायिक संत मंडळींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. आंबेडकरांचा टाळ व वीणा देवून स्वागत करण्यात आले. यावेळी कोरोना काळात विठ्ठल मंदिर खुले केले म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार देखील करण्यात आला.
संसदेवरील हल्ल्यावर ॲड.आंबेडकरांची प्रतिक्रिया –
सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे.तिथे जी जुनी वॉच अँड वॉर्ड ची सुरक्षा व्यवस्था होती ती अत्यंत मजबूत होती. ती मध्यंतरी दिल्ली पोलिसांना देण्यात आली. आणि त्यानंतर या घटना घडताना दिसत आहेत. अतिसंवेदनशील केंद्राची सुरक्षा लोकल सुरक्षा व्यवस्था करू शकत नाही.
संसदेत घुसलेल्या तरुणांची कोर्ट केस व्हावी, शिक्षा कायम झाल्यास त्यांची शिक्षा माफ व्हावी.
मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीत लोकचं ठरवतील –
राज्यात शांतता हवी असेल तर ॲड. प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा असे विधान आमदार बच्चू कडू यांनी काल नागपूर येथील अधिवेशनात केले. यावर मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीत लोकचं ठरवतील. असे ॲड आंबेडकरांनी म्हटले आहे.