Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

mosami kewat by mosami kewat
March 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
       
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश साठे जिल्हाध्यक्ष यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. किसन चव्हाण (राज्य महासचिव) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी, “येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीची ताकद गावपातळीवर अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष विजय घाडगे, उपाध्यक्ष विनोद चांदणे, सचिव राजकुमार घाडगे, खजिनदार अशोक चांदणे, सहसंघटक संतोष घाडगे, सल्लागार शिमोन घाडगे आदींच्या शाखा पदाधिकारी म्हणून निवड करून घोषणा जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केली. 

इतर महत्त्वाच्या निवडी अनिता शरद अंगरखे शाखाध्यक्ष, कुरुडगाव महिला आघाडी, अरुण कडू निळ: शाखाध्यक्ष, कुरुडगाव करण्यात आल्याचे रवींद्र निळ जिल्हा संघटक यांनी सांगितले. या सोहळ्याला भारतीय बौद्ध महासभेचे नितीन खंडागळे यांच्यासह विविध संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तसेच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी शाहूराव खंडागळे (जिल्हा उपाध्यक्ष), रवींद्र निळ (जिल्हा संघटक), प्यारेलाल शेख (तालुकाध्यक्ष), ऑगस्टींग गजभिव (युवक तालुकाध्यक्ष), वसंत आव्हाड या कार्यक्रमाला नजीक बाभुळगाव परिसरातील ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Tags: ahmadnagarMaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Aghadi Opens New Branch
Previous Post

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

Next Post

अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

Next Post
अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home