परभणी : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाला ओबीसीत (OBC) समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन वेळा नकार दिला आहे आणि तो निर्णय कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठा समाजातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजात ‘निजामी मराठा’ (Nizami Maratha) आणि ‘रयतेचा मराठा’ (Rayatecha Maratha) असे दोन गट आहेत. निजामी मराठे हे निजामाच्या बाजूने राहिलेले, तर रयतेचे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले आहेत.
सोळाव्या शतकापासूनचा हा संघर्ष आजही सुरू आहे. “सत्तेतील निजामी मराठ्यांमुळे रयतेला न्याय नाही” सत्तेत बसलेला वर्ग हा निजामी मराठ्यांचा असून, त्यांची रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याची मानसिकताच नाही, असा थेट आरोप अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, “जोपर्यंत रयतेतील मराठा हा निजामी मराठ्यांपासून फारकत घेत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही.” रयतेतील मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, ते श्रीमंत नाहीत. त्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीलाही निजामी मराठा वर्ग पाठिंबा देत नाही, असे त्यांनी नमूद केले.
पुण्यात SRA विरोधी वंचित बहुजन आघाडीचा विराट धडक मोर्चा’ यशस्वी; प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य!
“बदलासाठी मतदारांनी ठरवावे” –
निजामी मराठ्यांच्या हातातून सत्ता रयतेतील मराठ्यांच्या हातात जाईल, या भीतीमुळे सत्तेतील निजामी मराठे रयतेतील मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. “निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी अॅड. आंबेडकर यांनी रयतेच्या मतदारांना आवाहन केले आहे की, “आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की, त्यांना बदल हवा आहे की नाही?”






