Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

Akash Shelar by Akash Shelar
May 21, 2026
in बातमी
0
पैठण पंचायत समितीत दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना तात्काळ राबविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
पैठण : जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना” प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

या योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी निधी राखीव ठेवला जातो. त्या माध्यमातून विविध प्रकारचे अर्थसहाय्य तसेच आवश्यक साहित्य वाटप केले जाते. मात्र, कार्यालयीन स्तरावरील उदासीनतेमुळे पैठण तालुक्यातील अंध, अस्तिव्यंग, मतिमंद, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग व्यक्ती आपल्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने तात्काळ आर्थिक लाभ व इतर योजनांचा लाभ देऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सदस्य शेषराव निकाळजे, तालुका संघटक अभिजीत पाटील पवार, शहर महासचिव दत्ता वाहुळे, सुरेश केसापुरे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Divyang Welfare SchemeMaharashtraMaharashtra newsPaithan Panchayat SamitiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

Next Post

भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
September 1, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त राज्यस्तरीय परिषदेत बोलताना भटक्या-विमुक्त समूहाला स्वाभिमानाची आणि...

Read moreDetails
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026
‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

September 1, 2026
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

September 1, 2026
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home