Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

mosami kewat by mosami kewat
August 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न
       
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र पातोडे यांची लोकशाही पद्धतीने मतदानातून निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अकोला येथील मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालयात त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

शिव शाहु फुले आंबेडकर विचारधारेवर काम करणाऱ्या या चळवळीने प्रचंड मताधिक्याने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राजेंद्र पातोडे यांचा गौरव केला. या सोहळ्याला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र कोरडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रदेश संघटक उत्तमराव माने, प्रदेश सदस्य प्रा. प्रदीप चोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सीमाताई बोके, जिल्हाध्यक्षा रेणुताई गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना राजेंद्र पातोडे यांनी सर्व पुरोगामी चळवळींनी एकदिलाने, अठरापगड जाती धर्मांना सोबत घेऊन काम करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या धर्तीवर पुन्हा एकदा तसेच स्वराज्य उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिव शाहू फुले आंबेडकर विचारांच्या सर्व सामाजिक चळवळींनी हातात हात घालून काम करण्याचे तसेच महाराष्ट्रासह देशाला प्रतिगामी विचारांच्या जोखडातून मुक्त करून पुरोगामी दिशेने नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सचिव प्रा. संदीप निर्मळ यांनी केले, तर शिवश्री पंकज जायले यांनी प्रास्ताविकातून सत्कार समारंभाची भूमिका मांडली. या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, सचिन शिरोळे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AkolaMaharashtraPolitical
Previous Post

शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे सुजात आंबेडकर यांची संवाद बैठक

Next Post

लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

Next Post
लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home