Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट

mosami kewat by mosami kewat
August 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लोहा शहरात पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना; सुजात आंबेडकर यांची भेट
       
नांदेड : लोहा शहरातील जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. या ठिकाणी सन १९९२ पासून असलेला पंचशील ध्वज काही समाजकंटकांनी काढून टाकल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

यानंतर ८ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी आणि सकल बौद्ध समाजाच्या वतीने संबंधित ठिकाणी पंचशील ध्वजाची पुनर्स्थापना करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जायकवाडी वसाहतीतील या ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची त्यांनी माहिती घेतली. पंचशील ध्वजाचा सन्मान आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Tags: LohaMaharashtranandedPanchshil flagPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

Next Post

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post
खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू झाले पाहिजे - ॲड. प्रकाश आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home