नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी नांदेड येथील खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
याप्रसंगी भदंत पयांबोधी थेरो यांची उपस्थिती होती. तसेच सुजात आंबेडकर यांच्या भेटीच्या वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





