Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक –  रेखाताई ठाकूर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 3, 2022
in बातमी, राजकीय
0
ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक –  रेखाताई ठाकूर
       

मुंबई – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आरक्षण  देण्याच्या विषयावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. या निकालानुसार मागासवर्गीयांना आरक्षणाला घातलेली ५० % ची मर्यादा उच्चवर्णीयांसाठी शिथील करण्यात आली आहे. मनुस्मृतीने ज्याप्रमाणे कायद्यासमोर सर्वाना समान वागणूक दिली नाही. उच्चवर्णीयांना सौम्य शिक्षा व शूद्रातिशूद्रांना कडक शिक्षा असे दुहेरी मापदंड लावले तशीच दुटप्पी नीती या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने वापरली आहे.  SC, ST, OBC वगळून उरलेल्या १५ % लोकसंख्येतील फक्त १८ % गरिबांना १० % आरक्षण देऊन सुप्रीम कोर्ट मोकळे झाले हा भयंकर पक्षपात आहे. उच्च उच्चवर्णीयासाठी जर सुप्रीम कोर्टाने घातलेली ५० % ची मर्यादा राहणार नसेल, तर देशातील ५२% ओबिसींच्या आरक्षणाला घातलेली २७ % ची मर्यादा आम्ही मानणार नाही. त्यामुळे ओबिसींना लोकसंख्येच्या प्रमाणात ५२ % आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.

इंद्रा सहानी खटल्यात १३ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेला निर्णय बदलण्याचे काम ५  न्यायमूर्तीच्या घटनापीठाने करणे हा खरेतर घटनात्मक पेचप्रसंग आहे. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला ५० % ची मर्यादा आणि उच्चवर्णीयांसाठी ही ५० % ची अट शिथील करणे हा सर्व सरळसरळ भेदभाव आहे व मागील दाराने मनुस्मृती आणण्याचे काम केले आहे. उच्चवर्णीय वगळता इतर प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला या आरक्षणाचा लाभ घेण्याला मज्जाव करण्याची भूमिका समान न्यायाच्या मूलभूत संकल्पनेला ठेच लावणारी आहे. या देशातील उच्च नीचतेच्या सामाजिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी संविधानाने केलेल्या उपाय योजनांना खीळ घालण्याचे हे षडयंत्र आहे.

फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार यांच्या नेतृत्वातील बहुजन चळवळीने फिरविलेले सामाजिक परिवर्तनाचे चक्र उलटे फिरविण्याचे हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या अधिकारांचे भावी पिढ्यांसाठी रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२% आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे व त्यासाठी आंदोलनाची हाक देत आहे. अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली.


       
Tags: obcrekhathakurreservationVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

Next Post

चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

Next Post
चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बातमी

शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

by mosami kewat
August 14, 2025
0

‎धुळे : शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रशासकीय अनियमिततेविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...

Read moreDetails
Election commission :  निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

Election commission : निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

August 14, 2025
संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 13, 2025
आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा 'जबाब दो' मोर्चा

आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा ‘जबाब दो’ मोर्चा

August 13, 2025
मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

August 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home