नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकूण पाचपैकी चार जागांवर भाजपाचा पराभव झाला आहे, तर केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातमधील विसावदर मतदारसंघातही भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव झाला. (Bjp defeat for state assembly bypolls)
१) आम आदमी पार्टी (आप): 2 जागांवर विजय (गुजरात – विसावदर, पंजाब – लुधियाना पश्चिम)
२) भारतीय जनता पार्टी (भाजप): 1 जागेवर विजय (गुजरात – कडी)
३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस): 1 जागेवर विजय (केरळ – निलांबूर)
४) अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी): 1 जागेवर विजय (पश्चिम बंगाल – कालीगंज)
गुजरातमधील विसावदर येथे झालेला पराभव भाजपासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. 2022 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील या जागेवर ‘आप’चाच ( आम आदमी पार्टी) उमेदवाराने बाजी मारली होती. मात्र नंतर त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक झाली होती. (Bjp defeat for state assembly bypolls)
बिहार, पश्चिम बंगाल, केरळ आणि गुजरात या राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु, पाचपैकी चार जागांवर झालेला पराभव भाजपासाठी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चिंता वाढवणारा आहे.