Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
March 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत देण्यात येणारी सन २०२३, २०२४ आणि २०२५ ची पीएचडी फेलोशिप (BANRF) जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बार्टीच्या महासंचालकांना निवेदन देण्यात आले असून, जाहिरात तत्काळ प्रसिद्ध न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे. (BARTI PhD Fellowship)

मिळालेल्या माहितीनुसार, महाज्योती आणि सारथी यांसारख्या इतर शासकीय संस्थांकडून इतर मागासवर्गीय (OBC) आणि मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना २०२३ ची पीएचडी फेलोशिप आधीच प्रदान करण्यात आली आहे. मात्र, ‘समान निकष धोरण’ लागू करण्याच्या नावाखाली बार्टीची २०२३ ची जाहिरात अद्याप रोखून धरण्यात आली आहे. इतर संस्थांप्रमाणे जाहिरात न काढता केवळ बार्टीच्या विद्यार्थ्यांवरच हे धोरण लादणे, हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (BARTI PhD Fellowship)

Also Read : शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

या धोरणात्मक दिरंगाईमुळे अनेक पात्र विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांच्या पीएचडी शिक्षणाचे तीन वर्षांचे कालावधी पूर्ण होत आले आहेत. तरीही शासनाकडून अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या अन्यायाची दखल घेऊन सन २०२३, २०२४ आणि २०२५ ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नाईलाजास्तव न्यायालयात किंवा अनुसूचित जाती/जमाती आयोगाकडे धाव घ्यावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका प्रशांत बोराडे (प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र), ऋषिकेश कांबळे, आकाश शेलार, नालंदा वाकोडे, आणि प्रवीण हिवराळे यांनी व्यक्त केली आहे. (BARTI PhD Fellowship)

Tags: BANRF Fellowship DelayBARTI Advertisement DelayBARTI PhD FellowshipEqual Policy ControversyFellowship 2023 2024 2025Higher Education CrisisLegal Action WarningMaharashtra Education NewsPhD Scholarship MaharashtraPune Education NewsResearch Fellowship IssueSamyak Vidyarthi AndolanSC Students ProtestScheduled Caste StudentsScholarship Delay Protest
Previous Post

शिक्षकाच्या आत्महत्येने बीड हादरले; ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी

Next Post

मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home