Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार

mosami kewat by mosami kewat
March 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मध्य प्रदेश हादरले! ५० लाख जिंकणाऱ्या KBC विजेत्या तहसीलदार गजाआड; १२७ बनावट खात्यांद्वारे केला भ्रष्टाचार
       
मध्य प्रदेश: मध्यप्रदेशात एका धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला तहसीलदार अमृता सिंह तोमर यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. 

2021 साली बडोदा तहसील परिसरात झालेल्या सुमारे अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. ग्वालियरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांना शिवपुरी येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. (KBC Winner and Tehsildar Amrita Singh Tomar Arrested)

तोमर या यापूर्वी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी 50 लाख रुपये जिंकले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

तपासानुसार, श्योपुर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी वितरित करण्यात येणाऱ्या मदतनिधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्या वेळी तोमर तहसीलदार पदावर कार्यरत होत्या. कंत्राटदारांच्या मदतीने 127 बनावट बँक खाती उघडून सरकारी निधी वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आला. (KBC Winner and Tehsildar Amrita Singh Tomar Arrested)

या प्रकरणी बडोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेपूर्वी त्यांनी ग्वालियर खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु तेथूनही दिलासा मिळाला नाही. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांना विजयपूर तहसीलदार पदावरूनही हटवण्यात आले आहे.

Tags: Abhitabh bacchanBollywoodKbcKbc winnerKBC Winner and Tehsildar Amrita Singh Tomar ArrestedMadhya Pradesh
Previous Post

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

Next Post

१ एप्रिलपासून आर्थिक नियमांत मोठे बदल: PAN, ITR आणि मील कार्डबाबत महत्त्वाचे निर्णय

Next Post
१ एप्रिलपासून आर्थिक नियमांत मोठे बदल: PAN, ITR आणि मील कार्डबाबत महत्त्वाचे निर्णय

१ एप्रिलपासून आर्थिक नियमांत मोठे बदल: PAN, ITR आणि मील कार्डबाबत महत्त्वाचे निर्णय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home