Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
May 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Samyak Vidyarthi Andolan : देशभर गाजत असलेल्या NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २९) सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होत असलेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाद्वारे NEET परीक्षेतील गैरव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा संघर्ष प्रश्नपत्रिका फुटीमुळे व्यर्थ गेला असून देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. (Samyak Vidyarthi Andolan)

Also Read : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

यावेळी जिल्हाधिकारी सांगली यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, NEET ची फेरपरीक्षा विनामूल्य घेण्याची मागणी, Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी, NTA ची सखोल चौकशी तसेच NEET परीक्षा UPSC मार्फत घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण थांबवून व्यावसायिक कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली.

Also Read : हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

यावेळी शिवाजी उर्फ पवन रमेश वाघमारे, ऋषिकेश माने, सिद्धार्थ पवार, अक्षय मागाडे (सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगली), तसेच संजय संपत कांबळे, प्रशांत संगाप्पा वाघमारे, संजय भुपाल कांबळे, हिरामन भगत, परशुराम कांबळे (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन), अशोक लोंढे, मोहन साबळे, विनायक मोरे, मनोज सनदे, मधुकर शेस्वरे, सचिन कोलप, रोहित कांबळे, मानतेश कांबळे, विशाल धेंडे, रणजित कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Samyak Vidyarthi Andolan)

Tags: Education CorruptionEducation JusticeExam ReformsNEET Paper LeakNEET ScamNEET UG 2026NTASamyak Vidyarthi AndolanSangli NewsSave Students Futurestudent protestVanchit Bahujan Aghadi
Previous Post

लोहा येथे ३२ वर्षांपासून फडकत असलेला पंचशील ध्वज हटवला; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आंदोलनाचा इशारा 

Next Post

मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

Next Post
मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home