Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

mosami kewat by mosami kewat
May 29, 2026
in बातमी, सामाजिक
0
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी स्पिरिटयुक्त गावठी दारूमुळे मृत्यूंचा आकडा १३ वर पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील काळेपडळ भागात तीन तर हडपसर परिसरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर अनेकांना तोंडाला फेस येणे, उलट्या होणे आणि अचानक प्रकृती खालावल्याची लक्षणे दिसून आली. काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Also Read : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा सराईत अवैध दारू विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने तयार केलेली स्पिरिटयुक्त विषारी दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत विक्रीसाठी पुरवल्याचा आरोप आहे.

गेल्या ४८ तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये फुगेवाडी परिसरातील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी आणि भीमाप्पा बसवंत पुजारी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वायसीएम आणि मेडीपॉईंट रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Also Read : फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड

स्थानिक नागरिकांकडून विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत वेगळा दावा केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाच्या अधिकृत अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेनंतर अवैध दारू विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Tags: Dapodi newsIllegal liquor casePimpri Chinchwad NewsPune NewsToxic liquor
Previous Post

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

Next Post

NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home