Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

mosami kewat by mosami kewat
August 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!
       
अहमदनगर : नांदगाव (ता. जि. अहमदनगर) ग्रामपंचायतीच्या कारणापुरती ग्रामसभेत महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ला ग्रामस्थांनी एकमुखाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याच्या महावितरणच्या धोरणाविरोधात ग्रामसभेत जोरदार चर्चा होऊन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तात्काळ बंद करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

ग्रामसभेत ग्रामस्थांनी स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज बिलांमध्ये होणारी वाढ, ग्राहकांच्या हिताचे रक्षण न होणे, मीटरची अचूकता, तक्रार निवारणाची अस्पष्टता आणि भविष्यात सर्वसामान्यांवर पडणारा आर्थिक बोजा या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासकीय धोरणानुसार स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. तरीही उपस्थित ग्रामस्थांनी यास स्पष्ट नकार दिला. सदर ग्रामसभेत वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर तालुकाध्यक्ष रविकिरण जोसेफ जाधव यांनी स्मार्ट मीटर बसवणे बंद करण्याचा ठराव मांडला, तर दत्तात्रय बाबुराव वर्पे यांनी त्यास अनुमोदन दिले. 

या ठरावाची प्रत महावितरणच्या देहरे येथील संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पुढील कडक कारवाईसाठी पाठवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव यांच्या समवेत दत्तात्रय बाबुराव वर्पे, संजय जाधव, प्रवीण जाधव, अशोक जाधव, सतीश जाधव, राजू सोनवणे, मुकुंद सोनवणे, पाराजी मोरे, पोपट जाधव, मनोज जाधव, दत्तात्रय पुंड, शाम पाटील सोनवणे, बाळासाहेब सोनवणे आदींसह ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ahmadnagarMaharashtraSmart prepaid electricity metersVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित
बातमी

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

by mosami kewat
September 30, 2026
0

मुंबई : इराणच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन...

Read moreDetails
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home