Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

mosami kewat by mosami kewat
July 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले
       
नांदेड : दिल्ली येथे विद्यार्थी व आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे गटनेते इंजी. प्रशांत विराज इंगोले यांनी केले आहे.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक, नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आले असून नांदेड बंद शांततापूर्ण, संविधानिक व लोकशाही मार्गाने पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही तसेच सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इंजी. इंगोले यांनी व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. हा बंद कोणत्याही व्यक्ती किंवा घटकाविरोधात नसून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच रुग्णालये, ॲम्बुलन्स सेवा, औषध दुकाने व इतर अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील आणि त्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी शांतता, संयम आणि संविधानिक मूल्यांचे पालन करत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही इंजी. प्रशांत विराज इंगोले यांनी केले आहे.

Tags: MaharashtraMaharashtra BandhNeet ExamNEET Paper LeakPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

Next Post

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home