Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

mosami kewat by mosami kewat
September 23, 2025
in बातमी
0
Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

‎
‎मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
‎
‎सलग सुरू असलेल्या या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मागील २४ तासांत मराठवाड्यात पावसाने ८ जणांचा बळी घेतला आहे, तर शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले असून, तिथे ५७ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्या खालोखाल धाराशिव आणि परभणीमध्ये अनुक्रमे २१ आणि २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. एकूण १२९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
‎
‎सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे बीड, धाराशिव आणि परभणीमध्ये बचाव कार्यासाठी लष्कराला (आर्मी) पाचारण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधून लष्कराच्या तुकड्या मदत कार्यासाठी रवाना झाल्या आहेत. गोदावरी नदीच्या वाढत्या पातळीमुळे संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‎
‎हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पुढील दोन दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, धाराशिवमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
‎
‎या संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर ‘जगायचं कसं?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

Tags: beedCrop DamageMaharashtraMonsoonrain
Previous Post

मृत्यूनंतरही जात आडवी येते तेव्हा…

Next Post

Raigad : पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

Next Post
Raigad : पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

Raigad : पनवेल महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home