Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी
       

मनमाड : मनमाड शहरातील“रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा!” सार्वजनिक रस्त्यांना अधिकृत नाव अथवा क्रमांक देऊनच नगरपरिषदेच्या विकासकामांची प्रशासकीय प्रक्रिया राबवावी, अशी ठोस मागणी वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीने मनमाड नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 185(1)(a) व 185(1)(b) मध्ये सार्वजनिक रस्त्यांना नाव अथवा क्रमांक देण्याची तसेच त्यासंदर्भात फलक लावण्याची तरतूद असल्याचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीने नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शहरातील रस्त्यांची विकासकामे मंजूर करताना किंवा कार्यादेश काढताना “अमुक घरापासून तमुक घरापर्यंत रस्ता”, “अमुक व्यक्तीच्या घरापासून तमुक ठिकाणापर्यंत” अशा पद्धतीने रस्त्याची ओळख निश्चित करण्याऐवजी प्रत्येक रस्त्याला अधिकृत नाव अथवा क्रमांक देऊन त्याच नाव/क्रमांकाच्या आधारे संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने पुढे म्हटले आहे की, रस्त्याचा अधिकृत क्रमांक किंवा नाव एकदा निश्चित झाल्यानंतर तोच क्रमांक अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी, निविदा, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका (MB), बिल, काम पूर्णत्व प्रमाणपत्र तसेच नगरपरिषदेच्या रस्ता नकाशा व अभिलेखांमध्ये सातत्याने नमूद करण्यात यावा.

यामुळे एखाद्या रस्त्याचे काम नेमके कुठे झाले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च झाला आणि कामाची अंमलबजावणी कोणत्या ठिकाणी झाली, याचा मागोवा घेणे नागरिकांना व प्रशासनाला सहज शक्य होईल. त्यामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सार्वजनिक निधीच्या वापरावर प्रभावी नियंत्रण निर्माण होण्यास मदत होईल.

मनमाड नगरपरिषद हद्दीतील सर्व सार्वजनिक रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना अधिकृत नाव अथवा क्रमांक देण्यात यावा, प्रत्येक रस्त्यावर नामफलक/क्रमांक फलक लावण्यात यावा आणि यापुढील सर्व रस्ते विकासकामांच्या कागदपत्रांमध्ये संबंधित रस्त्याचा अधिकृत क्रमांक किंवा नाव नमूद करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

आता नगरपरिषद प्रशासन या मागणीवर आपल्या सभेत ठराव मांडून अंमलबजावणी करणार किंवा कसे? काय  भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कधीपासून रस्त्यांना अधिकृत क्रमांक दिले जातात, याकडे वंचित बहुजन आघाडीसह सर्व मनमाडकरांचे लक्ष लागले आहे.

या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहिरे, जिल्हासचिव कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे,शहर उपाध्यक्ष निलेश निकम, सागर गाडे,शहर महासचिव अमोल केदारे, शहर संघटक सुनील बागुल, खुशाल थोरात , अशपाक शाह, राकेश पगारे, काकासाहेब भालेराव आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


       
Tags: developmentMaharashtraManmadPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

Next Post

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

Next Post
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home