Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

mosami kewat by mosami kewat
September 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!
       
अमरावती: तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुक्याच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना खरमरीत निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रशासनाविरोधात गावकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ उभारण्याचा थेट इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदनात तालुक्यातील ढासळलेल्या नागरी सुविधांवरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. दापोरी येथील बंद असलेला आर.ओ. वॉटर प्लांट तात्काळ सुरू करून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, अनुसूचित जाती वस्त्यांमधील रस्त्यांवर पसरलेले चिखलाचे साम्राज्य दूर करून स्वच्छता मोहीम राबवावी आणि पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात धूर फवारणी  करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

‘एक वर्षातच पूल खचला; चौकशी करा!’

वरूडा येथील अनुसूचित जाती वस्तीतील पूल बांधणीनंतर अवघ्या एकाच वर्षात खचून गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची आक्रमक मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सिद्धार्थ कटारने, भुजंग वावरे, अनिल गाडगे, श्रीकृष्ण वावरे, सचिन बाखडे, अभिषेक मनोहरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: amravatiMaharashtraPoliticalTivasaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

Next Post

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home