मंगळवेढा : वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने मंगळवेढा येथे युवा तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या बांधणी व निवडीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष दीपसागर पाराध्ये आणि युवा जिल्हा सचिव सोमनाथ ढावरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते गणेश जांभळे आणि रामोशी समाजाचे मोहन बोडरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. युवा जिल्हाध्यक्ष दीपसागर ऊर्फ पंकज पाराध्ये, तालुकाध्यक्ष अशोक माने आणि सोमनाथ ढावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तालुका प्रसिद्धीप्रमुख अंकुश शेवडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, तालुकाध्यक्ष अशोक माने, मंगळवेढा शहर अध्यक्ष अजय गाडे, तालुका उपाध्यक्ष बाळू वाघमारे, लखन कांबळे, अंकुश शेवडे, खंडू घोडके, दत्ता लांडगे, सुरेश शिंदे, तुषार आठवले, संदेश शिंदे, सुशील शिंदे, सुदर्शन शिंदे, अभिषेक शिंदे, बबलू कांबळे, अजय वाघमारे, बिरोबा कोळी, सिद्धांत खवतोडे, राहुल शिवशरण, दीपक शेंबडे, सचिन शेंबडे, समाधान शेंबडे, प्रताप शिवशरण यांच्यासह युवा आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुजात आंबेडकर यांचे अमित शहा यांना चॅलेंज!
“अमेरिकेत सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या NRI वर तात्काळ कारवाई करा!” अमरावती : अमेरिकेत भारताचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या विरोधात काही...
Read moreDetails






