प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
’रेड अलर्ट’ जारी झालेले जिल्हे
पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असलेले जिल्हे:
१) रायगड
२) रत्नागिरी
३) पुणे घाटमाथा
४) सातारा घाटमाथा
५) भंडारा
६) गोंदिया
७) चंद्रपूर
८) गडचिरोली
मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, नागरिकांना सतर्कतेचा इशार
संभाव्य पूरस्थिती आणि नद्या-नाल्यांमधील पाण्याची वाढ लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे...
Read moreDetails