पुणे : राज्यात अनुकूल हवामानामुळे मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून, अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहरात गेल्या २४ तासांत पावसाची तीव्रता कमी असली असून धरण क्षेत्रात मात्र पावसाने पुन्हा जोर धरला आहे. शिवाजीनगर परिसरात १.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, कमाल तापमान २९.७ अंश सेल्सिअस होते. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर आणि साताऱ्याला झोडपणार पाऊस: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून, शहरात १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातही गेल्या २४ तासांपासून दमदार पाऊस पडत आहे. सातारा शहरात १७ मिमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
हवामान खात्याने सातारा शहरात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, घाटमाथ्यावर मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. एकूणच, येत्या काही दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...
Read moreDetails





