जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद गावात सुलेमान खान या मुस्लिम युवकाची मॉब लिंचिंग करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येच्या निषेधार्थ व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी (VBA) व एकता फाउंडेशनच्यावतीने यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभाताई पाटील, एकता फाउंडेशन अध्यक्ष कुर्बान शेख करीम, अन्वर भाई खाटीक (फैजपूर), वंचित बहुजन आघाडी यावल तालुकाध्यक्ष भगवानभाऊ मेघे, समाजसेवक शेख अलीम, आरिफ भाई, शफी भाई, कबीर खान, मजर खान तसेच शहर व परिसरातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाद्वारे सरकारने या अमानुष हत्येचा निषेध करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
भाजप–ईव्हीएम–निवडणूक आयोग महागठबंधनाचा विजय; काँग्रेसच्या घोडचुकीने संधी दवडली – सुजात आंबेडकर
हिंगोली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी...
Read moreDetails






