Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!

mosami kewat by mosami kewat
March 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!

वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!

परभणी : चुडावा (ता. पूर्णा) येथील डॉ. स्वाती गोविंद सोळंके यांच्या अक्षम्य वैद्यकीय निष्काळजीपणामुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी उपाध्यक्ष राजरत्न गायकवाड रा. वसमत जि. हिंगोली यांच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर दोषी डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील यांची भेट घेऊन त्यांना तीव्र जाब विचारण्यात आला.

राजरत्न गायकवाड यांच्या पत्नीच्या उपचारादरम्यान डॉ. स्वाती सोळंके यांनी 2 मार्च 2026 रोजी रात्री दोन वाजेपर्यंत थांबवून घेऊन नॉर्मल डिलिव्हरी करते असे सांगत गर्भातच बाळाचे ठोके बंद झाल्यानंतर विष्णुपुरी नांदेड (Nanded) येथे रेफर केले. यामुळे निष्पाप बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे सिझेरियन शस्त्रक्रिया करून विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी बाळाला मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

बदर समितीचा ‘अ ब क ड’ अहवाल सादरीकरणाचा फार्स अनुसूचित जातींची फसवणूक!

पीडित कुटुंबाने असा आरोप केला आहे. एका सामान्य कार्यकर्त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ मैदानात या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य कार्यालयावर धडक दिली.

यावेळी उपस्थित असलेल्या नेत्यांनी संबंधित डॉक्टरांचे (Doctor) वैद्यकीय चौकशी करून निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (Vanchit Bahujan Aghadi)

यावेळी राजू इंगोले (माजी जिल्हा कार्याध्यक्ष, हिंगोली), राहुल करवंदे (माजी जिल्हा सहसचिव, वंचित बहुजन आघाडी), तुषार गायकवाड (युवा जिल्हाध्यक्ष, परभणी), प्रवीण बारहाते (माजी युवा जिल्हा उपाध्यक्ष, हिंगोली) राजरत्न गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

“सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही. राजरत्न गायकवाड यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा सुरूच ठेवेल.” असे वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ म्हणाले. (Vanchit Bahujan Aghadi)

आरोग्य अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, कारवाईत टाळाटाळ झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Tags: Baby DeathCausality Due to NegligenceDoctor AccountabilityHealth AdministrationHealth Department InquiryHealth System FailureHealth System ReformLegal Action Against DoctorsMedical NegligenceNanded ReferralPerbhani IncidentProtest for JusticeVanchit Bahujan AghadiVidyasagar Patil
Previous Post

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-आरएसएसवर घणाघात; ट्विटमधील संवाद चर्चेत, नागपूरात २३ मार्चला आंदोलनाची हाक

Next Post

बिहार राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली !

Next Post
बिहार राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली !

बिहार राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home