Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बिहार राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली !

Akash Shelar by Akash Shelar
March 17, 2026
in बातमी
0
बिहार राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते फुटली !
       

राज्यसभा निवडणुकीत ‘महागठबंधन’चा अनपेक्षित पराभव

पाटणा : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बिहारमध्ये घडलेला निकाल हा आकड्यांचाचं खेळ नव्हता, तर तो विरोधकांच्या संघटनात्मक कमकुवतपणाचा आणि सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीचा स्पष्ट पुरावा ठरला. पाच जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात असल्याने चुरस अटळ होती; मात्र शेवटी निकालाने ‘महागठबंधन’च्या गणितालाच तडा दिला.

या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ने आपले सर्व पाच उमेदवार विजयी करत अतिरिक्त जागाही काबीज केली. भाजपचे शिवेश राम यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजय मिळवत विरोधकांच्या हातातून जवळपास निश्चित मानली गेलेली जागा हिसकावून घेतली. या पराभवामागील सर्वात मोठं कारण म्हणजे विरोधकांची अंतर्गत विस्कळीतता. ‘महागठबंधन’कडे संख्याबळ असूनही मतदानाच्या वेळी काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रीय जनता दलाचा एक आमदार अनुपस्थित राहिला. ही अनुपस्थिती ही तांत्रिक चूक नसून, ती विरोधी आघाडीतील समन्वयाच्या अभावाची साक्ष ठरली.

राजकीय पातळीवर पाहता, विरोधकांनी ‘एमआयएम’ आणि ‘बसपा’चा पाठिंबा मिळवत विजयाचे समीकरण जुळवले होते. मात्र, मतदानाच्या निर्णायक क्षणी झालेले गैरहजेरीचे राजकारण त्यांच्या डावावर पाणी फिरवणारे ठरले. परिणामी, दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपला संधी मिळाली आणि त्यांनी ती अचूक साधली.

दरम्यान, या निकालानंतर विरोधकांनी भाजपवर ‘घोडेबाजार’ आणि आमदारांवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हे आरोप फेटाळत विरोधकांच्या अपयशाला त्यांचीच अंतर्गत फूट जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बिहारमधील हा निकाल एक व्यापक संदेश देतो. फक्त संख्याबळ असून चालत नाही, तर संघटनात्मक शिस्त, वेळेवर उपस्थिती आणि राजकीय समन्वय तितकाच महत्त्वाचा असतो.

‘महागठबंधन’ला आता या पराभवातून धडा घेत पुढील निवडणुकांसाठी आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे, अन्यथा अशाच प्रकारे राजकीय गणित पुन्हा पुन्हा बिघडत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


       
Tags: Bihar electionCongressMahagathbandhanNdaNitish KumarOpposition Unity
Previous Post

वंचित बहुजन आघाडी आक्रमक: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आरोग्य प्रशासनाला विचारला जाब!

Next Post

पारदर्शक हिशोबामुळे धम्मकार्याला गती मिळेल  : ॲड. एस. के. भंडारे

Next Post
पारदर्शक हिशोबामुळे धम्मकार्याला गती मिळेल  : ॲड. एस. के. भंडारे

पारदर्शक हिशोबामुळे धम्मकार्याला गती मिळेल  : ॲड. एस. के. भंडारे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home