Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर: पालघरमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर, शाळांना सुट्टी

mosami kewat by mosami kewat
July 26, 2025
in बातमी
0
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर: पालघरमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर, शाळांना सुट्टी

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर: पालघरमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर, शाळांना सुट्टी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‎
‎राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‎
‎पालघरमध्ये ‘रेड अलर्ट’, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

‎गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. आज (शुक्रवारी) पालघर जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
‎
‎सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या पावसामुळे शेतीकामांना वेग आला असून, 80 टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे.
‎
‎रायगडला ‘ऑरेंज अलर्ट’, महाड-पोलादपूरमधील शाळांना सुट्टी
‎
‎रायगड जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. महाबळेश्वर परिसरात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
‎
‎विदर्भातही पावसाची हजेरी
‎
‎विदर्भातील अनेक जिल्ह्यांसह नागपूरमध्येही आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. एकंदरीत, पुढील काही तास राज्याच्या विविध भागांसाठी पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत.
‎

Tags: Maharashtra heavy rainMonsoonpalgharRed AlertSchools
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!

Next Post

मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

Next Post
मुंबई विमानतळावर बॉम्बच्या अफवेने खळबळ: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home