लाखो लोक उपस्थित राहणार !
पुणे : वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा पुण्यातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. सभास्थळी सर्व व्यवस्था करण्यात आली असून एसएसपीएमएस महाविद्यालयाचे मैदान सज्ज झाल्यचे पाहायला मिळत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभा आयोजित केली आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेसासाठी मोठा मंच तयार करण्यात आला असून सभेसाठी एसएसपीएमएस महाविद्यालयाचे मैदानही सज्ज झाले आहे. महाराष्ट्रभरातून तसेच पुण्याच्या कान्याकोपऱ्यातून नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने सभास्थळी सर्व सोयी करण्यात आल्या असल्याचे दिसून येत आहे.

वंचित बहुजन समाज घटकांच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा महाराष्ट्रभर झंझावात सुरू आहे. काल परभणीत एल्गार महासभेनंतर आज पुण्यात सत्ता परिवर्तन महासभा होणार आहे.