औरंगाबाद : औरंगाबादमध्ये “एकता की रात – जश्न-ए-ईद मिलन” या कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सुजात आंबेडकर यांनी ईद सणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, ईद हा केवळ आनंद आणि उत्सवाचा सण नसून तो बंधुता, एकता आणि समानतेचा संदेश देणारा सण आहे.

समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन एकात्मता मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समानतेवर आधारित भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

तसेच, महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला उघडपणे साथ देणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजाचे मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थितांनी एकता आणि बंधुतेचा संदेश देत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






