Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!

mosami kewat by mosami kewat
July 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!
       
मनमाड: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड शहरात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अभूतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.

गेल्या काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारच्या कारभारावर तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे न्याय आणि संविधानाचा विजय झाला असल्याची भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

मनमाड शहरातील प्रमुख चौकात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत परिसर दुमदुमून टाकला. “घेतला रे घेतला, राजीनामा घेतला -धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, अभी नरेंद्र मोदी बाकी है ” अशा विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

या जल्लोष कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीसह सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक व संविधान प्रेमी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष विलास आहिरे, शहर सचिव अमोल केदारे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ऍड. आम्रपाली निकम, जिल्हा सचिव कदीर शेख, शहर उपाध्यक्ष निलेश निकम आणि सागर गाडे. शहर संघटक -अशपाक शाह, सुनील बागुल, खुशाल थोरात, जॉय साळवी, सौरभ डोळस. आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील मनमानी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी हा राजीनामा अत्यंत आवश्यक होता. हा विजय देशातील तमाम संविधान प्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष विलास आहिरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनात आणि जल्लोषात मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Dharmendra PradhanDharmendra Pradhan ResignsMaharashtraManmadPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

Next Post

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

Next Post
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home