Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

mosami kewat by mosami kewat
April 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
       
अहमदनगर : घारगाव येथे विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळावर झालेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील लोककलावंतांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या तमाशा कलेला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तमाशा फडाचे वाहन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबले असताना काही समाजकंटकांनी गाडी आडवी लावून अडवली. यानंतर फडातील महिला कलाकारांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत ड्रायव्हरने शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला उत्तर म्हणून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे तमाशा फडातील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ahmedabad News)

ही घटना केवळ एकाकी नसून, राज्यभरात यात्रा आणि जत्रांच्या काळात तमाशा फडांना अशा प्रकारच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या गावात जाऊन आपल्या कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या या कलावंतांना स्थानिक पातळीवरील काही गावगुंडांकडून अपमानास्पद वागणूक आणि असुरक्षितता सहन करावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. (Ahmedabad News)

तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे. मात्र, या कलेमागे उभे असलेले कलाकार आजही उपेक्षित आणि असुरक्षित जीवन जगत आहेत, ही कटू वस्तुस्थिती आहे. ज्या कलाकारांच्या कलेवर समाज टाळ्यांचा वर्षाव करतो, त्यांच्याच सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील ग्रामस्थ, यात्रा समित्या आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन तमाशा फडांना ठोस सुरक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून अशा समाजकंटकांना वचक बसवावा, अशी मागणी लोककलावंत समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यासह विविध स्तरांतून केली जात आहे. (Ahmedabad News)

“कलावंत सुरक्षित असेल, तरच कला टिकेल आणि कला टिकली, तरच संस्कृती जिवंत राहील,” असा ठाम संदेश देत या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: ahmadnagarMaharashtraPolitical
Previous Post

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

Next Post

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home