Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

mosami kewat by mosami kewat
April 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन
       
औरंगाबाद : शहरातील सोमवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी भरत असलेल्या आठवडी बाजार बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हा निर्णय जनविरोधी असून तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील आठवडी बाजार हे केवळ व्यापाराचे केंद्र नसून हजारो ग्रामीण शेतकरी, मजूर, लहान व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल थेट शहरात विक्रीस आणत असल्याने त्यांना योग्य दर मिळतो, तसेच शहरातील नागरिकांनाही ताज्या भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतात. (Aurangabad Weekly Market)

जर हे बाजार बंद करण्यात आले, तर हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील मजूर, हातगाडीवाले, छोटे विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. (Aurangabad Weekly Market)

वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाला आवाहन करण्यात आले आहे की, आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि शेतकरी, व्यापारी व नागरिकांच्या हिताचा विचार करून बाजार नियमित सुरू ठेवावेत. आवश्यक असल्यास बाजार व्यवस्थापनात सुधारणा करून ते सुरळीतपणे चालू ठेवावेत. दरम्यान, हा निर्णय मागे घेतला नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: AgriculturalaurangabadAurangabad Weekly MarketFarmerfoodMaharashtraMarketvbaforindia
Previous Post

घारगाव येथे तमाशा फडावर भ्याड हल्ला; कलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Next Post
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home