Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बिल्डर सुशील रहेजा प्रकरण: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने पोलिसांना फटकारले!

mosami kewat by mosami kewat
February 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बिल्डर सुशील रहेजा प्रकरण: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने पोलिसांना फटकारले!
       

‘वंचित’च्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका !

मुंबई :  मुंबईत राहुल जाधव या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा आरोपी बिल्डर सुशील रहेजा विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजा अद्याप मोकळा असताना, दुसरीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याने खळबळ माजली होती. 

सुशील रहेजाने त्याच्याकडे कामाला असलेल्या राहुल जाधव यांना “तुम जयभीम वाले गंदे लोग, तुम साले घाटी, सुधरेंगे नही” म्हणत भर ऑफिसमध्ये मारहाण केली होती. या प्रकरणी आरोपी सुशील रहेजावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला पोलिसांनी अटक केली नाहीये. 

काल रात्री पोलिसांनी वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई आणि इतरांना बिल्डर रहेजाचे ऑफिस तोडफोड प्रकरणी अटक केली होती. आज त्यांना भोईवाडा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका न्यायालयाने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे की, एखाद्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यात आरोपींना नोटीस देणे बंधनकारक असते. त्या गुन्ह्यात जर आरोपी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत असेल तर त्याला अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे कायदा सांगतो. मुंबई पोलिसांनी कुठलीही नोटीस न देता थेट अटक केली होती.

मुंबई पोलिसांनी बिल्डर रहेजा आणि राजकीय पक्षांच्या दबावाखाली हे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

 


       
Tags: BhiwandiMaharashtrapolicePoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नियम कागदावरच, शहर कचऱ्यात! सफाई कर्मचारी गायब असल्याने नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

Next Post

पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post
पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पुण्यात माता रमाई जयंती व वंचित बहुजन महिला आघाडीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
बातमी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 12, 2026
0

भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...

Read moreDetails
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home