Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नियम कागदावरच, शहर कचऱ्यात! सफाई कर्मचारी गायब असल्याने नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात

mosami kewat by mosami kewat
February 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नियम कागदावरच, शहर कचऱ्यात! सफाई कर्मचारी गायब असल्याने नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे स्वतः उतरले मैदानात
       
यवतमाळ: “स्वच्छ यवतमाळ, सुंदर यवतमाळ”च्या गप्पा मारणाऱ्या नगरपालिकेचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. ई-रिक्षा चालक आणि सफाई कर्मचारी कामावर गैरहजर असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

 प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी स्वतः मैदानात उतरून कचऱ्याची गाडी घेऊन पालिकेच्या कारभाराचा पर्दाफाश केला. (Vanchit bahujan aghadi)

यवतमाळ नगरपालिकेने कचरा संकलनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ई-रिक्षांची सोय केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे नियम केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये ई-रिक्षा वेळेवर येत नाहीत तसेच सफाई कर्मचारी कामावर दांड्या मारत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यावेळी, शहरातील मुख्य रस्ते आणि वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने, अखेर नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहून त्यांनी स्वतः मैदानात उतरून महापालिकेचा निषेध केला. (Vanchit bahujan aghadi)

ई-रिक्षा चालक आणि सफाई कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे यावरून स्पष्ट होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहराची अवस्था बिकट झाली असून, आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल यवतमाळकर विचारत आहेत.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan AghadivbaforindiaYavatmal
Previous Post

भाजप समर्थक बिल्डर सुशील रहेजासाठी पोलिसांची तत्परता; वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांना नियमबाह्य अटक!

Next Post

बिल्डर सुशील रहेजा प्रकरण: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने पोलिसांना फटकारले!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा
बातमी

पुणे शहरात कडकडीत बंद राहणार ; बंदला विविध सामाजिक आणि लोकशाही वाद्यांचा पाठिंबा

by mosami kewat
July 22, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री...

Read moreDetails
मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

मोदी सरकारची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सामील व्हावेः डाव्या पक्षांचे आवाहन !

July 22, 2026
दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये समविचारी पक्षांचा पाठिंबा

July 22, 2026
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड बंद यशस्वी करण्यासाठी व्यापारी, शैक्षणिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे : इंजी. प्रशांत विराज इंगोले

July 22, 2026
२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

२३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल उतरणार; शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याचे डॉ. भीमराव साहेब आंबेडकर यांचे आवाहन

July 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home