सांगली : उत्तरकाशी येथील सिलकयारा बोगद्यात मागील १७ दिवसांपासून ४१ मजूर अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी १६ दिवसांपासून बचावकार्य सुरू होते. संपूर्ण देश या मोहिमेवर लक्ष ठेवून होता, मात्र सतराव्या दिवशी सर्व कामगारांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी बचाव कार्यातील लष्कराचे आणि बोगद्यातून बाहेर आलेल्या कामगारांचे ट्विटरच्या माध्यमातूनअभिनंदन केले आहे.
NDRF, SDRF, NDMA, भारतीय लष्कर, रॅट होल खाण तज्ञ, परदेशी तज्ञ आणि इतर राज्य आणि केंद्रीय एजन्सी आणि उत्तराखंड टनल कोलॅप्समध्ये अडकलेल्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन.असे त्यांनी म्हटले आहे.
बचाव कार्यात अडथळे आले पण बचाव कर्मचार्यांचा 17 दिवसांहून अधिक काळचा निर्धार आणि अथक परिश्रम यामुळे त्यांना इतिहासातील सर्वात कठीण बचाव मोहीम यशस्वीपणे पार पाडता आली. असेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
दरम्यान, 400 तासांहून अधिक काळ, अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या मोहिमेतील प्रत्येक अडथळ्यावर मात करुन भारतीय आणि परदेशी मशीन आणि तज्ञांद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात आले. बोगद्याच्या आत आणि बाहेर 41 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात नेले जाईल. आरोग्य तपासणी आणि आवश्यक उपचारानंतरच त्यांना घरी पाठवले जाईल.