Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

mosami kewat by mosami kewat
February 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक
       
मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणात आता भारताच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या गंभीर प्रकरणावर भूमिका घेण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या, २० फेब्रुवारी रोजी मुंबईत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एपस्टीन फाईलसारख्या गलिच्छ प्रकरणात देशाच्या पंतप्रधानांचे नाव येणे ही देशासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. मात्र, सभागृहातील प्रमुख विरोधी पक्ष या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अनेक संघटनांनी विरोधी पक्षांकडे आवाज उठवण्यासाठी विनंती केली, परंतु तिथून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. (Vanchit bahujan aghadi)

बाळासाहेब आंबेडकरांकडे नेतृत्वाची धुरा :

प्रमुख विरोधी पक्षांच्या उदासीनतेमुळे अनेक सामाजिक संघटनांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली असून, या लढ्याचे नेतृत्व करण्याची विनंती त्यांना केली आहे. देशाची प्रतिमा आणि नैतिकतेचा प्रश्न असल्याने याविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vanchit bahujan aghadi)

या प्रकरणातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि केंद्र सरकारला घेण्याची रणनीती स्पष्ट केली जाणार आहे.

Tags: Donald TrumpEpstein fileMaharashtramumbainarendra modiPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

Next Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्ना सिरसाठ यांचा विशेष सत्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home