Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

mosami kewat by mosami kewat
February 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!
       

मुंबई  : भारत सरकार MRFA (Multi-Role Fighter Aircraft) कार्यक्रमांतर्गत फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या व्यवहाराच्या पारदर्शकतेवर आणि अटींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संरक्षण खरेदीतील एक चूक दशकानुदशके सुरक्षा त्रुटी निर्माण करू शकते, असा इशारा देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. (Prakash ambedkar)

आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारला खालील पाच प्रमुख प्रश्न विचारले आहेत :

१) राफेलची निर्मिती करणारी ‘डसॉल्ट एव्हिएशन’ कंपनी विमानाचा सोर्स कोड भारतासोबत शेअर करणार का? असा प्रश्न ॲड. आंबेडकरांनी विचारला आहे. सोर्स कोड नसल्यामुळे भारतीय हवाई दल पाकिस्तान किंवा चीनच्या नवीन रडार सिग्नेचर्सचा समावेश करण्यासाठी राफेलची ‘थ्रेट लायब्ररी’ स्वतंत्रपणे अपडेट करू शकत नाही. ही एक मोठी तांत्रिक उणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.

२) या व्यवहारामध्ये १००% तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) समाविष्ट आहे की हा केवळ सुटे भाग जोडून विमान बनवण्याचा (Screw-driver assembly) करार आहे ? याबाबत त्यांनी सरकारकडे स्पष्टता मागितली आहे. भारताला स्वावलंबी व्हायचे असेल तर पूर्ण तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे.

३) रशियाने त्यांच्या पाचव्या पिढीतील (5th Generation) प्रगत Su-57E विमानासाठी स्वस्त आणि १००% तंत्रज्ञान हस्तांतरणाचा प्रस्ताव दिला असताना, भारत अधिक महागडे आणि ४.५ पिढीचे राफेल विमान का खरेदी करत आहे? 

४. रशियाकडून प्रगत विमाने खरेदी करू नयेत यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदी सरकारवर दबाव टाकत आहेत का? 

५. करारातील १८ विमाने थेट फ्रान्समधून येतील, मात्र उर्वरित ९६ विमानांची निर्मिती भारतात होणार आहे. ही विमाने अनुभवी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) बनवणार की पंतप्रधान मोदींचे मित्र, ज्यांचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आले आहे असे, अनिल अंबानी यांच्या कंपनीला हे कंत्राट दिले जाणार? 

संरक्षण खरेदीमध्ये भारताला चुका करणे परवडणारे नाही. या प्रश्नांची उत्तरे मिळणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.


       
Tags: Donald TrumpEconomicsGlobal newsPrakash AmbedkarRafalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे

Next Post

‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

Next Post
‘एपस्टीन फाईल्स’वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

'एपस्टीन फाईल्स'वरून वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा; वंचित बहुजन आघाडीसोबत सामाजिक संघटनांची उद्या बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home