Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे

mosami kewat by mosami kewat
February 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
छत्रपती शिवाजी महाराज हे ‘विभाजनाचे’ नव्हे, तर ‘ऐक्याचे’ प्रतीक: योगेश साठे
       
अहिल्यानगर: “छत्रपती शिवाजी महाराज हे समाजाला तोडणारे नव्हे, तर जोडणारे ‘ऐक्याचे’ प्रतीक आहेत. ज्या काळात माणुसकी पायदळी तुडवली जात होती, त्या काळात महाराजांनी अठरा पगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र गुंफून विश्वासाचे स्वराज्य निर्माण केले,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले. 

वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी व शहरवासीयांना शुभेच्छा देताना साठे यांनी समाजातील वाढत्या भेदाभेदावर परखड भाष्य केले. आज काही संधीसाधू लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजात भेदाची भिंत उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराजांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी त्यांच्यासारखी प्रगल्भ आणि सर्वसमावेशक दृष्टी ठेवली पाहिजे. केवळ शौर्यावर राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या ‘कर्तव्याचा’ आदर्श घेणे ही काळाची गरज आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj jayanti )

शिवजयंती हा उत्सव द्वेषाचा नसून कृतज्ञतेचा आहे. समाजात विष कालवणाऱ्यांना शिवकालीन ‘ऐक्याने’ आणि संयमाने उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते फैरोज पठाण यांची प्रमुख उपस्थितीत होते. ॲड. योगेश गुंजाळ युवा शहराध्यक्ष, सुधीर ठोबे जिल्हा संघटक, योगेश क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष, देविदास भालेराव, संतोष पवार, रवी भिंगारदिवे, रियाज शेख, संकेत शिंदे यावेळी जिल्हा, शहर आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘रयतेचा राजा, विचार स्वराज्याचा’ हा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.

Tags: ahilyanagarChhatrapati Shivaji MaharajChhatrapati Shivaji Maharaj jayantiMaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

कोंढाळीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

Next Post
मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

मोदी सरकारवर ट्रम्पचा दबाव आहे का? ; राफेल खरेदीवरून प्रकाश आंबेडकरांचे सरकारला प्रश्न!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home