Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

mosami kewat by mosami kewat
February 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
       

जालना : शहरातील अंबड चौफुली व मंठा बायपास रोड परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. देशभक्तीपर वातावरणात शिवरायांच्या शौर्य, स्वराज्य आणि न्यायनिष्ठेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2026)

शिवरायांच्या विचारांचा जागर

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी स्वराज्याची स्थापना केली. सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी प्रशासन हे त्यांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. आजच्या पिढीने त्यांच्या आदर्शांवर चालत सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti 2026)

कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये सुंदरलाल बगीनवाल (ओबीसी जिल्हा समन्वयक), सूरज सोनोवने (सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष), राजेंद्र खरात (जिल्हा संघटक), विलास नरवडे, गौतम वाघमारे, राजरत्न आचलखांब, संजय आदमाने, सत्यपाल गायकवाड, विलास भिंगारे यांचा समावेश होता.

तसेच गणेश शिंदे, नितीन बाळराज, बोरखेडीचे सरपंच मनोहर म्हस्के, संकेत दांडगे, सूरज काकडे, कपिल सूर्यनारायण, सुरेश आदमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजात समता, न्याय व बंधुभाव टिकवून ठेवण्याचा संकल्प केला. 


       
Tags: celebrationjalnaJalna newsMaharashtrashivjayantiVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्ना सिरसाठ यांचा विशेष सत्कार

Next Post

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन

Next Post
नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; 'रयतेच्या राजा'ला अभिवादन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home