Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन

mosami kewat by mosami kewat
February 20, 2026
in बातमी, सामाजिक, सांस्कृतिक
0
नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; ‘रयतेच्या राजा’ला अभिवादन
       
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये (दि. १९) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचा जागर करत त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दीपक पगारे (महानगर प्रमुख, वंचित बहुजन युवा आघाडी), उर्मिला गायकवाड (वंचित बहुजन महिला आघाडी), बाळासाहेब शेजवळ (दिंडोरी तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti)

उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘रयतेचे राज्य’ हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर जगासाठी आदर्श आहे. वंचितांना आणि शोषितांना न्याय देण्याचे कार्य महाराजांनी आपल्या स्वराज्यात केले. (Chatrapati Shivaji Maharaj jayanti)

गंगुर्डे यांनी यावेळी संपूर्ण नाशिककरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत, शिवरायांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेली “जय भवानी, जय शिवाजी” ची घोषणाबाजी आणि शिवप्रेमींचा उत्साह यामुळे परिसर शिवमय झाला होता. विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत दिमाखात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

Tags: Chatrapati Shivaji Maharaj jayantiHistoricalMaharashtranashikshivjayantiVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश

Next Post
निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश

निवडणुकीपूर्वीच्या 'रेवडी' संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष
Uncategorized

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

by mosami kewat
August 4, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे पार पडली. पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी मतदानातून नवीन...

Read moreDetails
FSSAI चा डाबरला मोठा धक्का: 100% च्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप, उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

FSSAI चा डाबरला मोठा धक्का: 100% च्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप, उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

August 4, 2026
आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

August 3, 2026
चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

August 3, 2026
आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

August 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home