Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 2, 2024
in राजकीय
0
देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवरील हल्ले वाढले

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजप-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले आहेत, हे उघड आहे.
आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती आणि जीवघेणे वातावरण निर्माण करण्याचा भाजप आरएसएसचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस गप्प का? यापैकी दोन हल्ले तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले. पण राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घटनांचा निषेध केला नाही किंवा त्यांना या हिंसाचारात बळी पडलेल्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. आपल्या मुस्लिम बांधवांवरील हिंसाचाराकडे लक्ष देण्यास काँग्रेस का टाळाटाळ करत आहे?

…तर एवढी भीती का?
मला सांगा, काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आणि भाजपा काँग्रेसपेक्षा वेगळा कसा? असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले की, मी तुम्हाला सर्वांना आधीच सावध केले होते आणि आता मी पुन्हा चेतावणी देत आहे. हे दोन्ही पक्ष एकच आहेत. त्यांना तुमची पर्वा नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत.

हा कोणत्या प्रकारचा मजबूत विरोधी पक्ष आहे?
यांच्यासाठी मुस्लिम हा फक्त निवडणुकीत जुमल्याप्रमाणे मते मिळवण्यासाठी वापरण्याचा शब्द आहे. मुस्लिम समाज जगला काय मेला काय, यांना काहीही फरक पडत नाही. हे फक्त आपली जुनी संपत्ती, खुर्ची आणि घरे वाचविण्याची लढाई लढत आहेत, देश वाचविण्याची नव्हे असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


       
Tags: bjpMaharashtraMuslimPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्यांची नावे जाहीर

Next Post

काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही

Next Post
काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही

काँग्रेस मुस्लिमांचे नाव घ्यायलाही तयार नाही

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

by mosami kewat
December 23, 2025
0

अकोला : अमरावतीच्या चांदुर रेल्वे निवडणुकीत शानदार यश मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...

Read moreDetails
बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नवनिर्वाचितांचा गौरव; 'बाळासाहेबां'कडून शुभेच्छा

बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नवनिर्वाचितांचा गौरव; ‘बाळासाहेबां’कडून शुभेच्छा

December 23, 2025
मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!

मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!

December 23, 2025
धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

December 23, 2025
नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव

नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव

December 23, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home