Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले

Akash Shelar by Akash Shelar
March 16, 2026
in बातमी, मनोरंजन
0
ऑस्कर 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; मायकेल बी. जॉर्डन आणि जेसी बकले चमकले
       

ऑस्कर 2026 : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या 96th Academy Awards सोहळ्यात यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पटकावत मोठी बाजी मारली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मायकेल बी. जॉर्डन यांना ‘सिनर्स’ या चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी मिळाला. तर ‘हॅमनेट’ या चित्रपटात विल्यम शेक्सपिअर यांच्या पत्नी अ‍ॅग्नेस शेक्सपिअरची भूमिका साकारणाऱ्या जेसी बकले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला.

‘वन बॅटल आफ्टर अनादर’ या चित्रपटाला आणखी एक मोठा सन्मान मिळाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी सीन पेन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, ‘सिनर्स’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक रायन कूगलर यांना सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा ऑस्कर मिळाला. अमेरिकेतील प्रोहिबिशन काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘सिनर्स’मध्ये जुळ्या भावांची कथा असून श्वेत-अश्वेत संघर्ष हा चित्रपटाच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे. ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ हा युद्धविरोधी (अँटी-वॉर) आशय असलेला चित्रपट असून युद्धाची पार्श्वभूमी असली तरी वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारी भावनिक कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. वर्गसंघर्ष आणि वर्णभेद यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवरही हा चित्रपट भाष्य करतो.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ‘वेपन्स’ चित्रपटासाठी एमी मॅडिगन यांना मिळाला. डॉक्युमेंटरी विभागात ‘मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचा पुरस्कार पटकावला, तर ‘ऑल द एम्प्टी रूम्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टचा ऑस्कर जिंकला.

प्रमुख पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट – वन बॅटल आफ्टर अनादर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – पॉल थॉमस अँडरसन (वन बॅटल आफ्टर अनादर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – मायकेल बी. जॉर्डन (सिनर्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जेसी बकले (हॅमनेट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सीन पेन (वन बॅटल आफ्टर अनादर)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – एमी मॅडिगन (वेपन्स)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – रायन कूगलर (सिनर्स)

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर – मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट – ऑल द एम्प्टी रूम्स


       
Tags: Academy Awards 2026Best Picture Oscar 2026One Battle After AnotherOscar Awards 2026 winnersOscar winners list 2026
Previous Post

घरगुती गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

Next Post

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post
नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड : राजू कांबळे हल्ला प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे IG कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
बातमी

अकोला: वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे उपोषणकर्त्या तायडे कुटुंबाला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

by mosami kewat
June 5, 2026
0

अकोला : काटीपाटी बॅरेज संग्रहाक प्रकल्पामुळे शेती बाधित झालेल्या रोहणा येथील मातंग समाजातील तायडे कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे...

Read moreDetails
धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

धापेवाडा: सियान ॲग्रो कंपनीत कामगार जखमी; कायदेशीर नुकसानभरपाईसाठी वंचित श्रमिक कामगार युनियनचे आंदोलनाचा इशारा

June 4, 2026
वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार

June 4, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'VBA सन्मान पुरस्कार २०२६' प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान; सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत नाट्यगृहात सोहळा संपन्न

June 4, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर फायर स्टेशन परिसर प्रकाशमय; नवीन स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांमध्ये आनंद

June 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home