Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका‎‎

mosami kewat by mosami kewat
August 25, 2025
in Uncategorized, बातमी
0
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका‎‎
       
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी यांना रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या लढ्यात न्याय मिळवून दिल्याबद्दल हा विशेष सत्कार करण्यात आला. ‎

यावेळी सत्कार समारंभात बोलताना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “माझा विश्वास फक्त बाळासाहेब आंबेडकरांवर आहे, कारण तेच आपल्याला न्याय देऊ शकतात.”‎‎त्यांनी सरकारवर आणि काही प्रमुख नेत्यांवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्व खोटे आहेत

“हे सरकार गरिबांचे नाहीये, फक्त श्रीमंतांचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्व खोटे आहेत,” असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करताना त्या म्हणाल्या, “एका गुराख्याला ज्ञान आहे, पण देवेंद्र फडणवीसला नाही. अजूनपर्यंत फडणवीस परभणीला का आले नाहीत? मुंबईत बसून त्यांनी माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला.”‎‎

राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका‎‎

यासोबतच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे आमच्याकडे आले आणि न्याय देण्याचे आश्वासन दिले, पण त्यानंतर कोणाचाही फोन आला नाही.”

‎‎या सत्कार समारंभाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि वडार समाजाचे नेते अनिल जाधव प्रमुख उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. अनिल नारायण जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला.

Tags: Anjali AmbedkarbjpcaseCongrescrimeFIRmurderparbhanipolicePrakash AmbedkarpuneSomnath suryavanshi caseSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadi
Previous Post

‎पुणे : सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिल्याबद्दल ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे सत्कार‎‎

Next Post

सूर्यवंशी कुटुंबीयांच्या धैर्यामुळे दोषी पोलिसांना शिक्षा होईल!

Next Post
सूर्यवंशी कुटुंबीयांच्या धैर्यामुळे दोषी पोलिसांना शिक्षा होईल!

सूर्यवंशी कुटुंबीयांच्या धैर्यामुळे दोषी पोलिसांना शिक्षा होईल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...

Read moreDetails
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home