औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य प्रवेशद्वारावर जिल्हा माहिती अधिकारी यांच्यावतीने आणीबाणी चा प्रसंग दाखविण्यासाठी एक फोटो प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात राजमुद्रा ठेवण्याऐवजी तेथे संगोल ठेवण्यात आला होता.
हा विषय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या निदर्शनास आला असता, त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांना सांगितला. त्यांनी क्षणाचा विलंब न करता जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.
याविषयी अतिरिक्त जिल्हाधिकारी अडकीणे यांना भेटून याविषयी विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ व त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना बोलावून घेतले. त्यांना सुध्दा याविषयी समाधानकारक उत्तर देता आले नाही.
त्यामुळे अडकीणे यांनी वंचित बहुजन आघाडीचा रुद्रावतार पाहून तात्काळ हे संगोल हलविण्यास सांगीतले. आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर हा जिल्हाधिकारी कार्यालयातील संगोल हटवला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भूईगळ, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, औरंगाबाद पच्श्रिम तालुकाध्यक्ष अंजन साळवे,शहर उपाध्यक्ष शाहीर मेघानंद जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनांचे प्रशांत बोर्डे, अमोल शिंदे, योगेश सोनवणे,रवि साळवे, दिपक सरकडे, प्रवीण गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.