Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 4, 2024
in राजकीय
0
महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.
       
अकोल्यात भाजप कार्यकर्त्याची दादागिरी !

अकोला: प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ता व नाली नसल्याने स्थानिक महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लावलेला फ्लेक्स भाजपच्या कार्यकर्त्याने फाडला असून ही दादागिरी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला अकोला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी व अकोला पोलिसांना करण्यात आली आहे. अकोला मनपा भाजप माजी नगरसेवक समर्थक व भाजप कार्यकर्ता बाळू देशमुख यांनी प्रभाग २० मधील महिलांनी लावलेला बॅनर फाडला. हा बॅनर महिलांना लावावा लागला कारण त्यांचे भागात गेली अनेक वर्ष रस्ता व नाली नाहीत.सोबतच पाच वेळा ह्या रस्त्याचे भूमिपूजन होवून तो रस्ता कागदोपत्री तयार झालेले आहे, असा स्थानिकांचा आरोप असून महिलांनी आपल्या समस्या मांडताच त्यांना दादागिरी करीत बोलण्याचा अधीकार नाही हेच भाजप कार्यकर्त्याने आपल्या कृती मधून सिद्ध केले असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पतोडे यांनी म्हटले आहे.

हा महिलांचा अवमान असून नारी शक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा अंधभक्तांचा जाहीर निषेध वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने करण्यात आला.

समस्त जिजाऊ नगर विकास समिती महिला मंडळ गोरक्षण रोड अकोला ह्यांनी देखील निषेध केला असून सत्तेचा माज आलेल्या लोकांना जनतेच्या भावना आणि अपेक्षा ह्याची पर्वा नाही. मतदार आणि सामान्य नागरिक लोकशाहीत सर्वोच्च असतात ह्याचा विसर भाजपला पडला आहे.अकोला पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून बॅनर फडणाऱ्या कार्यकर्त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजे.अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी ह्यांनी तातडीने बेड्या ठोकल्या पाहिजे अशी मागणी देखील वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने करण्यात आली आहे.

Tags: AkolaRajendra PatodeVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !

Next Post

मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर

मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर
बातमी

‘वंचित’च्या प्रचाराचा धडाका! हक्काच्या विकासासाठी आणि शेतकरी प्रश्नांसाठी ‘वंचित’ला साथ द्या: सुजात आंबेडकर

by mosami kewat
February 3, 2026
0

लासुर : "सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको,...

Read moreDetails
अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

February 3, 2026
भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

February 3, 2026
११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

February 3, 2026
प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

February 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home