Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 5, 2024
in राजकीय
0
मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई: छ. शिवाजी महाराजांच्या काळापासुन राहिलेले मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. निजामी मराठा (सत्ताधारी मराठा) जे मोगलांबरोबर राहिले आणि आता जे आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधले मराठे छ. शिवाजी महाराजांबरोबर राहिले आहेत. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वाक्य फार बोलके आहे. त्यांनी असं म्हटले की, आम्ही कुणबी समाजाच्या संदर्भात निर्णय घेतलाय. मराठा समाजाचा निर्णय शिंदे कमिशनमार्फत आल्यानंतर घ्यावा लागेल. असं वक्तव्य मी ऐकलं आहे. ते जर खरे असेल, तर कुणबी हा अगोदरच ओबीसीमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटलांनी अगोदरच म्हटलेलं आहे की, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी आहेत, त्यांना ही ग्राह्य धरावे आणि मुख्यमंत्र्यांनी जीआरमध्ये तसे नमूद केलेले आहे. अजून तो प्रश्न फायनल झाला नाही. कारण १६ तारखेपर्यंत त्यावर हरकती मागवल्या आहेत. त्याची सुनावणी होईल आणि त्यानंतरच तो जीआर फायनल होईल. जरी तो जीआर फायनल झाला, तरी तो कायदेशीर तपासणीमध्ये पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोघलाई मराठे हे रयतेमधल्या मराठ्यांची मुलगी सुंदर असेल तरच करतात. जर एखाद्या रयतेतल्या (गरिब) मराठा मुलांने निजामी मराठ्याच्या (श्रीमंत) मुलीशी लग्न करायचं ठरवले, तर त्याला ठामपणे विरोध होतो. त्यामुळे मराठा समाजात हे सामाजिक आतंरसंबध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष होत आहे. त्यावर त्यांनी हे स्पष्ट केले की, दोन्ही समाजाचे ताट शांतपणे सुप्रीम कोर्टाच्या चौकटीत वेगळे करता येईल. शासनाने काढलेला डेटा हा कोर्टात टिकणार नाही. हा फसवेगिरीचा प्रकार आहे आणि तो भाजप करत आहे.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत भाष्य केले.


       
Tags: Manoj JarangeMarathaMaratha ReservationPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

Next Post

‘वंचित’ च्या कार्यकर्त्याने पक्ष कार्यालयासाठी दिले स्वतःचे घर !

Next Post
‘वंचित’ च्या कार्यकर्त्याने पक्ष कार्यालयासाठी दिले स्वतःचे घर !

'वंचित' च्या कार्यकर्त्याने पक्ष कार्यालयासाठी दिले स्वतःचे घर !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट
बातमी

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

by mosami kewat
June 14, 2026
0

नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू...

Read moreDetails
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026
नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल

June 14, 2026
विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन

June 13, 2026
'निगेटिव्हिटी'चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

‘निगेटिव्हिटी’चा शिक्का आणि जबाबदारीची टाळाटाळ

June 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home