Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा

mosami kewat by mosami kewat
July 5, 2025
in बातमी
0
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सामान्य रेशनकार्ड धारकांना धान्य अपुरे मिळत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. ‎ ‎

निवेदनात वंचित बहुजन आघाडीने म्हटले की, मागील तीन महिन्यांपासून नागरिकांना नियमित रेशन मिळत नाहीये, आणि त्यांना केवळ दोन महिन्यांचे धान्य देऊन तिसऱ्या महिन्याचे धान्य नाकारले जात आहे. अनेक रेशन दुकानांमध्ये ग्राहकांकडून वारंवार अंगठ्याचे ठसे (बायोमेट्रिक) घेतले जात आहेत.

तसेच, दुकाने वेळेवर उघडली जात नाहीत आणि दुकानदारही उपस्थित नसतात, अशा तक्रारीही निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. ‎ ‎या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि रेशन दुकानदारांवर येत्या दहा दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

जर यावर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. ‎ ‎यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तसेच हनीफ शेख, योगेश गुंजाळ, जे डी शिरसाठ, प्रवीण ओरे, सुधीर ठोंबे, रवी किसन जाधव, प्रसाद भिवसने, राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, अमर निरभवने, चरण हरबा, कैलास पगारे, कैलास काटे, प्रमोद भिंगारदिवे, विश्वास वाघस्कर आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: administrationahilyanagarrationvbaforindia
Previous Post

अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

Next Post

Ahmednagar : ब्राह्मण्यवादी संघटनांनी बाबासाहेबांचा अपमान थांबवावा ; वंचित बहुजन आघाडीचा इशारा ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर
बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 22, 2026
0

मुंबई : IIT बॉम्बेशी संबंधित साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संस्थेच्या भूमिकेवर...

Read moreDetails
वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

September 22, 2026
पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

September 22, 2026
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

September 22, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

September 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home